17September2021

Vrutt Kesari

एक नजर

फेरबदलाच्या हालचालींना वेग

फेरबदलाच्या हालचालींना वेग

- कृष्णा यांचा राजीनामा; अन्य दोन मंत्र्यांची पदत्यागाची तयारी
- परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांचा राजीनामा पंतप्रधानांनी स्वीकारला असून, तो राष्ट्रपतींकडे पाठविला.
- सूचना व प्रसारण मंत्री अंबिका सोनी व सामाजिक न्यायमंत्री मुकूल वासनिक यांचीही राजीनाम्याची तयारी.
- पुढील वर्षी मे महिन्यात होणार्‍या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीची जबाबदारी कृष्णा यांच्याकडे.
- पश्‍चिम बंगालमधील काही काँग्रेस खासदारांची नव्या बदलात वर्णी लागण्याची शक्यता. 
- राहुल गांधींसाठी पंतप्रधान आग्रही


नवी दिल्ली। दि. २६ (लोकमत न्यूज नेटवर्क)
केंद्रीय मंत्रिमंडळात रविवारी फेरबदल होत असताना एस. एम. कृष्णा यांनी परराष्ट्र मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने त्यांचे खाते राहुल गांधींकडे सोपवावे, अशी आग्रही विनंती पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना केली. सोनियांनी मात्र यासंदर्भातील निर्णय राहुल यांच्यावर सोपविला आहे. मंत्रिमंडळात सहभागी होण्यास तयार नसतानाही राहूल यांच्यावर पक्षाच्या नेत्यांकडून दबाव टाकला जात आहे. 
उद्या राहुल गांधींशी चर्चा केल्यानंतर सायंकाळपर्यंत यासंदर्भातील निर्णय त्या पंतप्रधानांना कळवतील, अशी शक्यता आहे. पक्षाच्या ‘कोअर कमिटी’ची बैठक रद्द करून पंतप्रधानांनी आज सोनिया गांधींशी मंत्रिमंडळ विस्तार व फेरबदलावर एक तास चर्चा केली. राहुल गांधींनी मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिल्यास वाणिज्य मंत्री आनंद शर्मा परराष्ट्र मंत्री होऊ शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे. कॅबिनेट मंत्रिपदी बढती देण्यात येणार्‍या तरुण मंत्र्यांमध्ये ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट यांची नावे आघाडीवर आहेत, तर गुलाम नबी आझाद, अंबिका सोनी, आनंद शर्मा, पुरंदेश्‍वरी यांच्या खात्यात बदल होऊ शकतो. चिंरजीवी, बलराम नायक, सूर्यप्रकाश रेड्डी या नव्या चेहर्‍यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते.
दूरसंचार घोटाळ्यानंतर द्रमुकचे ए. राजा व दयानिधी मारन यांनी राजीनामे दिले. या रिक्त जागांवर दावा करणार नसल्याचे करुणानिधी यांनी याआधीच स्पष्ट केले आहे, तर तृणमूल काँग्रेस सरकारमधून बाहेर पडल्यानंतर पश्‍चिम बंगालमधील काही काँग्रेस खासदारांची नव्या बदलात वर्णी लागण्याची शक्यता आहे. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या कोट्यातील एक जागा रिक्त झाली आहे.

आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय

महिलांची सखी

आमच्या सोबत रहा

भारताची लोकसंख्या