17September2021

Vrutt Kesari

एक नजर

खंडणी टेपचा ‘झी’वर घाव

जिंदाल कंपनीकडून ‘स्टिंग ऑपरेशन’ खुले

नवी दिल्ली। दि. २५ (लोकमत न्यूज नेटवर्क)
कोळसा खाणपट्टे वाटपासंबंधात विरोधातील बातम्या प्रक्षेपित न करण्यासाठी १00 कोटी रुपयांची मागणी करून ‘झी’ वृत्तवाहिन्यांनी आपल्याला ‘ब्लॅकमेल’ करण्याचा प्रयत्न केला हे दाखविण्यासाठी केलेल्या कथित ‘स्टिंग ऑपरेशन’च्या दृक्श्राव्य टेप एका पत्रकार परिषदेत प्रसिद्ध करून जिंदाल स्टील अँण्ड पॉवर कंपनीने आज ‘झी’वर खुलेआम घाव घातला.

छत्तीसगडमधील रायगडच्या एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने विरोधात घोषणा दिल्याने नाट्यमय वातावरणात झालेल्या या पत्रकार परिषदेत जिंदाल कंपनीचे अध्यक्ष
व काँग्रेसचे खासदार नवीन
जिंदाल यांनी ‘स्टिंग ऑपरेशन’च्या टेप जाहीरपणे दाखविल्या.
‘झी’चा खंडणी वसुलीचा प्रयत्न सप्रमाण चव्हाट्यावर आणण्यासाठी जिंदाल कंपनीने १३ ते १९ सप्टेंबर दरम्यान दिल्लीतील विविध ठिकाणी उलटे ‘स्टिंग ऑपरेशन’ करून रेकॉर्डिंग केले, असे खासदार
जिंदाल म्हणाले.
या सर्व प्रकरणात झीच्या प्रतिनिधींचे वर्तन ‘निर्लज्जपणे ब्लॅकमेलिंग’ करणारे व न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशनने ठरवून दिलेल्या पत्रकारितेच्या मापदंडांना काळिमा फासणारे होते, अशी टिप्पणीही त्यांनी केली

आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय

महिलांची सखी

आमच्या सोबत रहा

भारताची लोकसंख्या