17September2021

Vrutt Kesari

एक नजर

विरोधक सत्तेसाठी हपापलेले!


विरोधक सत्तेसाठी हपापलेले!

सूरजकुंड (हरियाणा)। 
दि. ९ (लोकमत न्यूज नेटवर्क)
सत्ता बळकावण्यासाठी हपापलेल्या विरोधकांनी चालविलेल्या सरकार-विरोधी खोट्या प्रचाराला रोखठोक प्रत्युत्तर द्या, असे आक्रमक आवाहनवजा आदेश काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कार्यकर्त्यांना दिले. 
कोणत्याही प्रकारे केवळ सत्ता बळकावण्याचा विरोधकांचा खटाटोप आहे, असा घणाघात करतानाच त्यांनी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आता सज्ज व्हा, असा सजग आदेशही त्यांनी आज येथे दिला. 
लोकसभा निवडणूक दीड वर्षांवर आली असताना सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा घेण्यासाठी काँग्रेसने आज येथे ‘संवाद बैठक’ आयोजित केली. बैठकीला पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, कार्यकारिणीतील तसेच निमंत्रित सदस्य उपस्थित होते. 
सोनिया गांधी म्हणाल्या, बेगडी नैतिकता, चुकीचे धोरणात्मक मुद्दे व अपप्रचारावरच विरोधकांचा भर आहे. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला चोख उत्तर देण्यासाठी गेल्या आठ वर्षांतील सरकारची भरीव कामगिरी हीच आपली मोठी उपलब्धी आहे. सर्वसामान्यांसाठीची कटिबद्धता हाच आपला धर्म आहे. देशाचा चेहरामोहरा बदलण्यात यश येत आहे. 
२00९ च्या जाहीरनाम्यात दिलेल्या वचनांची उर्वरित काळात पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. महिला, दलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांचे कल्याण तसेच त्यांच्या सबलीकरणावर भर देण्याच्या उद्देशाने सरकारने त्वरित पावले उचलण्याचे आवाहनही त्यांनी केले. काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी या बैठकीचे मुख्य आकर्षण ठरले. ‘आम आदमी’ची बस
काटकसरीचा संदेश देण्यासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी व अन्य नेत्यांनी बसमधून सूरजकुंडपर्यंतचा प्रवास केला. अहमद पटेल, अंबिका सोनी, ए. के. अँटोनी, पी. चिदम्बरम आदींसह अनेक ज्येष्ठ नेतेही या बसमध्ये होते. दोन बसमधून हे 
नेते सुरजकुंडला पोहोचले. 

विरोधक केवळ सत्तेसाठी हपापलेले आहेत. लोकशाही, समानता, सार्वभौमत्व आणि धर्मनिरपेक्ष मूल्ये त्यांच्यासाठी महत्त्वाची नाहीत. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सक्षम नेतृत्वामुळे देशाला जागतिक मंदीच्या प्रभावातून बाहेर काढणे शक्य झाले.

आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय

महिलांची सखी

आमच्या सोबत रहा

भारताची लोकसंख्या