17September2021

Vrutt Kesari

एक नजर

राशी भविष्य

आपल्या राशीच्या धनस्थानातून गुरु-शुक्र-केतूचे भ्रमण येत असल्याने मोठे आर्थिक व्यवहार करतांना कुटुंबातील योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. घरात धार्मिक शुभसमारंभाचे आयोजन केले जाईल. आप्तस्वकियांच्या गाठीभेटीतून आनंद मिळवाल, प्रतिष्ठीत व्यक्तींचे सहकार्य लाभेल. प्रवासातून कार्यसिद्धी होईल. सुखस्थानातील रवि बुध आपले वाहन-वास्तुचे स्वप्न साकार करेल. सरकारी नोकरीत असणार्‍यांना नोकरीत अधिकार प्राप्ती होईल. सरकारी वाहनाचे योग येतील. षष्ठातील मंगळ-शनि नोकरीत धाडसी निर्णय घेण्यास प्रवृत्त करतील. व्यवसाय उद्योगात स्थैर्य लाभेल. नवीन कार्यारंभ केले जातील. हितशत्रूच्या कारवायांना मोठय़ा युक्तीवादाने सामोरे जाल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल.

राजकीय, सामाजिक क्षेत्रातून फायदेशीर घटना घडतील. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील. प्रकृतीच्या जुन्या तक्रारी डोके वर काढण्याची शक्यता राहते. आपल्या वक्तव्यामुळे दुसर्‍याचे मन दुखावणार नाही काळजी घ्या. लाभातील नेपच्यून धार्मिक-आध्यात्मिक क्षेत्रात ओढा वाढविणारा राहील. संतसज्जनांचा सहवास लाभेल. हातून पुण्यकर्म घडेल. उत्तरार्धात कामानिमित्त दूरचे प्रवास घडून येतील. लेखकांच्या हातून धार्मिक विषयांवर लेखन होईल. जून्या मैत्रीला उजाळा मिळेल. मित्रपरिवाराचे सहकार्य लाभेल

आपल्या राशीतील गुरु-शुक्र-केतूमुळे कुटुंबात शुभसमारंभाचे आयोजन होईल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश येईल. शुभशकुनांचा प्रत्यय येईल. प्रतिष्ठीत व्यक्तिच्या सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. आपल्या वाक्चातुर्याच्या जोरावर सभोवतालच्या व्यक्तींची मने जिंकून घ्याल. अनेकांशी सुसंवाद साधाल. परप्रांताशी आपले व्यावसायिक संबंध सुधारतील. परदेशस्थ भावंडांशी सुसंवाद साधाल. महत्वाच्या निर्णयात भावंडांचा सल्ला बहुमोलाचा ठरेल. उंची वस्त्रालंकारांची खरेदी कराल. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळवाल. महिला दैनंदिन जीवनातून विरंगुळा शोधण्याचा प्रयत्न करतील. सहलीचे आयोजन केले जाईल. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. पंचमस्थ मंगळामुळे संततीचे कर्तृत्व दिसून येईल. रवि-प्लूटोचा होणारा प्रतियोग समोर आलेल्या अडचणींवर मात करण्यात यश देईल. उत्तरार्धात जनसंपर्कातून लाभ होईल. नवीन व्यावसायिक करार होतील. महत्वाची कागदपत्रे हाती लागतील. खेळाडूंना सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील.

आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय

महिलांची सखी

आमच्या सोबत रहा

भारताची लोकसंख्या