17September2021

Vrutt Kesari

एक नजर

खेळाडूंसमोर द. कोरियाचा झेंडा

ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी सुरू झालेल्या महिला फुटबॉल सामन्याला वादाचे गालबोट लागले. कोलंबिया आणि उत्तर कोरिया यांच्यातल्या सामन्यात आयोजकांनी चुकून उ. कोरियाच्या खेळाडूंसमोर द. कोरियाचा ध्वज लावल्याने एकच गोंधळ उडाला. या सर्व प्रकारामुळे नाराज झालेल्या उ. कोरियाच्या खेळाडूंनी आंदोलनाचा पवित्रा घेत मैदान सोडले. आयोजकांनी आपली चूक मान्य करून संघाची आणि राष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीची माफी मागितली.

उत्तर आणि दक्षिण कोरियाची १९४८मध्ये फाळणी करण्यात आली होती. त्यानंतर १९५0पासून या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे आयोजकांच्या या चुकीने सामन्याआधीच वातावरण तापले होते. सामना सुरू होण्यापूर्वी स्टेडियमवर असलेल्या मोठय़ा स्क्रीनवर उ. कोरियाच्या खेळाडूंशेजारीच द. कोरियाचा ध्वज दिसत होता. हा सर्व प्रकार पाहताच उ. कोरियाई खेळाडूंनी याचा निषेध नोंदविला. आयोजकांनी ही चूक सुधारून पुन्हा नव्याने खेळाडूंची नावे स्क्रीनवर दर्शवावी, तरच सामना खेळण्यास उतरू, असा पवित्रा उ. कोरियाई खेळाडूंनी घेतला. ही चूक सुधारून आयोजकांनी झालेली नाचक्की टाळली असली तरी ही लढत तब्बल एक तास पाच मिनिटे उशिराने सुरू झाली. उत्तर कोरियाने साँग हुई किमच्या दोन गोलच्या बळावर २-0 असा विजय साजरा केला.

आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय

महिलांची सखी

आमच्या सोबत रहा

भारताची लोकसंख्या