17September2021

Vrutt Kesari

एक नजर

क्या सुपर कुल हें हम

मि. पर्फेक्शनिस्ट आमिर खानचा बॉलिवूडमध्ये दबदबा आहेच, त्याचे वडील , काका आणि भाऊ यांनीही सिनेसृष्टीत चांगलेच नाव कमावले.आता आमिरची पुढची पिढीही बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. आमिरचा १७ वर्षीय मुलगा जुनैद बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे, पण हिरोच्या रुपात नव्हे तर असिस्टंट डिरेक्टर म्हणून. इतर सुपरस्टार्सप्रमाणे आमिरलाही आपल्या मुलासाठी खास सिनेमा काढून त्याला लाँच करता आल असतं, पण जुनैदला सध्या अभिनयात नाही तर दिग्दर्शनात रस आहे. आणि म्हणूनच तो राजकुमार हिरानी यांच्या ‘पीके’ या पुढील चित्रपटात असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत आहे. स्वत: आमिर खान या चित्रपटात काम करणार असून त्याच्याबरोबर अनुष्का शर्माही झळकणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खुद्द राजकुमार हिरानीने जुनैदकडे आपल्या चित्रपटासाठी फर्स्ट असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करण्याबाबत विचारणा केली.

आमिरने प्रथम जुनैदला परवानगी नाकारली होती, मात्र जुनैदने असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करताना आपण अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही, असे आश्वासन देत आमिरची परवानगी मिळवली. जुनैदने चित्रपटासाठी काम सुरू केलेही असून सध्या तो देशभर चित्रीकरणासाठी योग्य लोकेशन शोधत फिरत आहे. लहानपणापासूनच जुनैदला चित्रपट दिग्दर्शनाबद्दल उत्सुकता होती. लहान असताना तो अनेक वेळा आमिरबरोबर चित्रपटांच्या सेटवर जात असे आणि छोट्या- छोट्या गोष्टींचे निरीक्षण करत असे. आमिरही आपल्या मुलाची बुद्धिमत्ता पाहून खुश झाला आहे. राजकुमार हिरानी आणि आमीरबरोबर अनेक वेळा काम केलेला विधु विनोद चोप्राही जुनैदच्या टॅलेंटमुळे तो खूप प्रभावित झाला आहे. जुनैदची कॅमे-याची आणि संगीताची समज पाहून तो खूप खुश झाला. आता मि. पर्फेक्शनिस्टचा हा मुलगा किती पर्फेक्शनने काम करतोय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय

महिलांची सखी

आमच्या सोबत रहा

भारताची लोकसंख्या